न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६. जुलै. २०२०) :- पिंपरी चिंचवडमधील विविध ठिकाणच्या दत्तगुरू, साई मंदिरांमध्ये दरवर्षी गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात येते. यंदा कोरोनामुळे भक्तांविना गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला.
दत्तगुरु, साई मंदिरांमध्ये रविवारी (दि. ५) सकाळी नित्य पूजा करण्यात आली. भोसरी – आळंदी रस्त्यावरील च-होली, प्राधिकरण निगडी, शाहूनगर , मोहननगर, जुनी सांगवी, पिंपरी कॅम्पमधील साई चौक येथे साईबाबांची मंदिरे आहेत. दरवर्षी या मंदिरांमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदा उत्सवावर कोरोनाचे सावट जाणवले. मंदिरांमध्ये सकाळची पूजा करण्यात आली. मात्र मंदिरे भाविकांसाठी बंदच होती. भक्तांनी कळसाचे दर्शन घेत साईंच्या दर्शनाचा आनंद घेतला.
शहरातील पिंपरीगाव, पॉवर हाऊस चौक, तपोवन मंदिर, शंकर नगर – पिंपळे सौदागर रस्ता, मोहननगर आदी ठिकाणच्या दत्त मंदिरांमध्येही गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळी नित्य पूजा करण्यात आली.












