न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६. जुलै. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहराच्या प्रथम नागरिक महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी कोरोनाची चाचणी करून घेतली आहे. त्यांचे रिपोर्ट रविवारी (दि. ५) रात्री उशिरा आले आहेत. त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
त्यामुळे महापौरांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून महापौर ढोरे या वयाच्या ६० व्या वर्षी सुद्धा अहोरात्र कार्यरत आहेत.
महापौर ढोरे म्हणाल्या, सध्या काळ वाईट आहे. मी काळजी घेऊनच रोजची दिनचर्या पार पाडत आहे. शहरवासियांनी अधिक काळजी घ्यावी. विनाकारण घराबाहेर पडू नये, काही कामानिमित्त बाहेर पडल्यास तोंडाला मास्क लावा. सुरक्षित अंतर पाळा. वारंवार हात धुवत राहा किंवा सॅनिटायजरने हात स्वच्छ करा असे आवाहनही त्यांनी केले आहे.












