न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६. जुलै. २०२०) :- कुदळवाडी परिसरात अनेक नागरिक राहतात. कोरोनामुळे नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण आहे. त्यामुळे महापालिकेने कुदळवाडी परिसरात मोफत करोना तपासणी शिबिर घ्यावे, अशी मागणी दिनेश यादव यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
खासगी दवाखान्यात नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लुट केली जात आहे. ज्यांना लक्षणे दिसतील त्यांना योग्य ठिकाणी सोय करावी. नागरिकांच्या मनातील शंका दुर करावी. ज्यांना किरकोळ आजार आहे त्यांना मोफत औषधे देण्यात यावेत. आपण कधी मोफत शिबीर आयोजित करणार आहात? असा सवालसुध्दा त्यांनी आपल्या लेखी मागणीपत्रातुन केला आहे.