न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ जुलै २०२०) :- कोरोना विषाणुचा शहरात कहर चालुच आहे. सोमवारी पिंपरी चिंचवड शहरात नगरसेवक व शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांना कोरोना विषाणुची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
राहुल कलाटे यांनी लॉकडाऊन काळात नागरीकांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केले होते. पालिकेतील बैठकांना हजेरी लावली होती. सतत जनसंपर्कात असल्याने त्यांचा अनेकांशी संपर्क आला होता.
लॉकडाऊन काळात नगरसेवक तसेच सामाजिक कार्यकर्ते स्वत:चा विचार न करता नागरिकांची सेवा करीत आहेत, त्यातील अनेकजण आता कोरोनाच्या विळख्यात अडकत आहेत. त्यामुळे शहरातील नागरीकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.












