न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जुलै. २०२०) :- पुणे जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने पुणे, पिंपरी चिंचवड शहरात दहा दिवस कडक लॉकडाऊनची शासनाने घोषणा केली आहे. त्यामूळे पिंपरी चिंचवड शहरातील नागरीकांनी जिवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी झुबंड उडाल्याचे पहावयास मिळत आहे.
लॉकडाऊनच्या भीतीने नागरीक किराणा, भाजीपाला तसेच दारू खरेदी करण्यासाठी गर्दी करीत होते. शिवाय तेथे कोणत्याही प्रकारच्या सोशल डिस्टन्सींगचे पालन होताना दिसले नाही. त्यामुळे आणखी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिका आयुक्तांनी गर्दी न करण्याचे व सोशल डिस्टन्सींगचे पालन करण्याचे नागरीकांना आवाहन करुन देखील त्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.















