न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जुलै. २०२०) :- महाराष्ट्रात सरकारने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गणेशमूर्तींच्या उंचीसंदर्भात काही निर्देश घालून दिले आहेत. ज्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्तीची जास्तीत जास्त उंची ही चार फूट तर घरगुती गणपतीची जास्तीच जास्त उंची दोन फूट असावी, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. ठाकरे सरकारने हे निर्देश दिले आहेत.
सार्वजनिक गणेशोत्सवासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी महापालिका/स्थानिक प्रशासन यांची त्यांच्या धोरणानुसार पूर्वपरवानगी घेणं आवश्यक आहे. कोविड १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता मा. न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश यांचे पालन करावे, असे राज्य सरकारने म्हटले आहे.















