न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३. जुलै. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज सोमवारी (दि. १३ जुलै) रोजी ३६१ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. आज पिंपरी चिंचवड हद्दीतील ९ आणि हद्दीबाहेरील २ अशा अकरा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
यात भाटनगर पिंपरी (पुरुष,६० वर्षे), इंदिरानगर (स्त्री,६० वर्षे), आकुर्डी (पुरुष,७३ वर्षे), मिलिंदनगर पिंपरी (स्त्री,९० वर्षे), यमुनानगर (पुरुष,८० वर्षे), भोसरी (पुरुष,६४ वर्षे), पिंपरी (स्त्री,६० वर्षे), पिंपरीगाव (पुरुष,६८ वर्षे), निगडी (स्त्री,७६ वर्षे), चाकण (पुरुष,५९वर्षे), खडकी बाजार (स्त्री,६५ वर्षे) यांचा समावेश आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ७६३७ वर पोहोचली आहे. महापालिका रुग्णालयात २१२२ रुग्ण उपचार घेत असून, महापालिका हद्दीतील रहिवाशी परंतु, इतर ठिकाणी उपचार घेत असणाऱ्या रुग्णांची संख्या १४ वर पोहोचली आहे. तर, आजपर्यंत शहरातील एकूण १२० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ४५९८ वर पोहोचली आहे. आज पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.















