न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३. जुलै. २०२०) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज मध्यरात्रीपासून दहा दिवसांचा लॉकडाउन असणार आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी विविध भागात पथसंचलन केले.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत असलेली रुग्ण संख्या पाहता आज सोमवारी मध्यरात्रीपासून लॉकडाउन लागू होणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने, व्यवसाय चार दिवस पूर्णतः बंद असणार आहेत. तर दहा दिवस आयुक्तालयातील कार्यक्षेत्रात संचार बंदी लागू असून खासगी वाहनबंदी असणार आहे, असे आदेश पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दिले.















