- कोरोनामुळे आज शहरातील ९ जणांचा तर हद्दीबाहेरील २ जणांचा मृत्यू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४. जुलै. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज मंगळवारी (दि. १४ जुलै) रोजी ५३५ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. आज पिंपरी चिंचवड हद्दीतील ९ आणि हद्दीबाहेरील २ अशा अकरा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
यात थेरगाव (स्त्री, ३० वर्षे), इंद्रयणीनगर, भोसरी (पुरुष, ६९ वर्षे), कासारवाडी (पुरुष, ६४ वर्षे) घरकुल, चिखली ( स्त्री, ६५ वर्षे), चिंचवड (पुरुष, ४२ वर्षे), मोशी ( स्त्री, ५३ वर्षे), नेहरुनगर ( पुरुष, ५० वर्षे), तळवडे (पुरुष, ५७ वर्षे), आनंदनगर, चिंचवड (पुरुष, ४८ वर्षे), तळेगांव रोड ( पुरुष, ५८ वर्षे), पुणे (पुरुष, ८० वर्षे) यांचा समावेश आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ८१७१ वर पोहोचली आहे. महापालिका रुग्णालयात १९४२ रुग्ण उपचार घेत असून, महापालिका हद्दीतील रहिवाशी परंतु, इतर ठिकाणी उपचार घेत असणाऱ्या रुग्णांची संख्या १४ वर पोहोचली आहे. तर, आजपर्यंत शहरातील एकूण १२९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ४८७९ वर पोहोचली आहे. आज पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.


















