न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. जुलै. २०२०) :- आमदार महेश लांडगे यांच्या सहकार्याने आणि स्वी. नगरसदस्य दिनेश यादव यांच्या अथक परिश्रमातून चिखलीतील कुदळवाडी मनपा शाळा परिसरामध्ये नागरिकांची विनामूल्य व मोफत कोविड १९ चाचणी करण्यात आली.
महापालिका व रुबी केअरच्या मार्फत वेगवेगळ्या प्रभागांमध्ये कोरोनाचा प्रभाव किती आहे, लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, तसेच लोकांनी स्व-पुढाकाराने तपासणी करून घेतली. यावेळी आकुर्डी रुग्णालयाच्या डॉ. सुनिता साळवी, गोरख कर्पे, सांळुखे यांनी सहकार्य केले.
यावेळी किशोर लोंढे, संभाजी बालघरे, नाना बालघरे, शंशीकांत पुंड, काका शेळके, राजेश डोंगरे, संचिन डिबंर, दत्तात्रय यादव, योगेश यादव व परिसरातील नागरिक उपस्थित होते.


















