न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६. जुलै. २०२०) :- आंध्र प्रदेश सरकारने करोनाच्या संसर्गाने मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करणाऱ्यांना १५,०००/- रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली.
“कोणत्याही हॉस्पिटलने करोना रुग्णांना दाखल करुन घेण्यास नकार देऊ नये, जर असं आढळलं तर त्या हॉस्पिटलविरोधात कठोर कारवाई केली जाईल”, असा इशारा मुख्यमंत्री रेड्डी यांनी दिला. दरम्यान, आंध्र प्रदेशमध्ये करोनाचा फैलाव वेगाने होत असून करोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.


















