न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६. जुलै. २०२०) :- पुण्यातील बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियामध्ये डॉ. नरसिंहन हे वरिष्ठ शास्त्रज्ञ होते. काही वर्षांपूर्वी ते येथून निवृत्त झाले. त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र रुग्णालयात व्हेंटिलेटर नसल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले. पंरतु, व्हेंटिलेटर न मिळाल्याने त्या निवृत्त शास्त्रज्ञाचा मृत्यू झाला.
डॉ.पी.लक्ष्मी नरसिंहन (६१) असे त्यांचे नाव आहे. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे.


















