न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि.१७. जुलै. २०२०) :- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. १९ जुलैपासून त्यात शिथीलता आणण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर रक्षाबंधन सणानिमित्त लागणाऱ्या राखी विक्रीला परवानगी द्यावी व दुकाने उघडी ठेवण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा, अशी मागणी सीमा कुंकुलोळ यांनी केली आहे.
राखी व्यवसावर अनेकजण अवलंबुन आहेत. या व्यवसायात गरजू महिला व अधं – अपंग बांधव वर्षानुवर्षे काम करतात. त्या माध्यमातून वर्षभर रोजगार मिळतो. त्याचा विचार करण्यात यावा. १९ जुलैपासून राखी विक्रीच्या व्यवसायाला परवानगी दिल्यास सर्व नियमांचे पालन करून व्यावसायिक ग्राहकांना योग्य सेवा देऊ शकतील.
तसेच, ग्राहकांना राखी खरेदीसाठी पुरेसा वेळ सुद्धा मिळेल. यासाठी दुकानाची वेळ वाढून दिल्यास गर्दी होणार नाही. जिल्हा प्रशासनाने १९ जुलैपासून शहरात राखी विक्रीच्या दुकानांना परवानगी द्यावी, अशी मागणी सर्व राखी निर्माते, कामगार व विक्रेत्यांच्या वतीने करण्यात आली आहे.


















