न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. जुलै. २०२०) :- काळेवाडी-पिंपरी या दोन गावांना जोडणाऱ्या पुलावरील वाहतूक २३ जुलै पर्यंत बंद करण्यात आली आहे. वाहतूक पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी याबाबत आदेश दिला आहे. शहरामध्ये २३ जुलै पर्यंत लॉकडाऊन जाहिर करण्यात आलेला आहे. त्याअनुषंगाने काळेवाडी पिंपरी पुल वाहनांकरिता १८ जुलै ते २३ जुलै या कालावधीपर्यंत बंद करण्यात आला आहे.
तसेच तळवडे विभागांतर्गत वाहतूक शाखेच्या वतीने वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. येथील देहूगाव मुख्य कमान ते आंबेडकर चौक या दरम्यान काही निर्बंध घालण्यात आले आहेत. या रस्त्यावर अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता सम व विषम तारखेस पार्किगचे तसेच आंबेडकर चौक ते मुख्यमंदिर व तालिम ते शिवाजी चौक येथील रस्त्यावर नो पार्किंग झोन अशा प्रकारचे निर्बंध घालण्यात आले आहेत. वाहतूक शाखेच्या उपायुक्त कार्यालयाने याबाबतचा आदेश दिला आहे.















