- आ. महेशदादांच्यासह सामाजिक कार्यकर्ते पांडाभाऊंनी केली पाहणी...
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. जुलै. २०२०) : – खासगी डॉक्टर आणि संघटनांच्या सदस्यांनी कोरोना केअर सेंटरमध्ये सेवा सुरु करावी, असे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी केले आहे. प्रभाग क्रमांक एक मधील काही डॉक्टरांशी आमदार लांडगे यांनी संवाद साधला. यावेळी नगरसेवक कुंदन गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते पांडाभाऊ साने उपस्थित होते.
शहरामध्ये प्रत्येक प्रभागत शंभर बेड चे क्वारंटाईन सेंटर उभारण्याचे नियोजन आहे. त्यानुसार प्रभाग क्रमांक एक मधील खासगी डॉक्टरांशी संवाद ठेवण्यात आला होता. त्यासोबतच नगरसेवक कुंदन गायकवाड आणि सामाजिक कार्यकर्ते पांडाभाऊ साने यांनी क्वॉरंटाईन सेंटरसाठी जागा सुचवली आहे. त्यानुसार आमदार महेश लांडगे यांनी क्वॉरंटाईन सेंटरसाठीच्या जागेची पाहणी करून चिखलीतील महापालिकेची नवीन शाळा इमारत याठिकाणी क्वॉरंटाईन सेंटर उभारण्याचे निश्चित झाले.
या क्वॉरंटाईन सेंटरमध्ये शंभर बेड ची व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रभागातील खासगी डॉक्टरांनी स्वतःहून सहभागी होऊन नागरिकांची सेवा करावी असे आवाहन आमदार लांडगे यांनी केले. आमदार महेश लांडगे आणि प्रभागातील नगरसेवक गायकवाड, पांडाभाऊ साने यांच्या या निर्णयामुळे प्रभाग क्रमांक एक मधील करोना रूग्णांसाठी आणि संशयितांसाठी मोठी सोय होणार आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.


















