न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. जुलै. २०२०) :- करोनाचा संसर्ग वाढीस लागल्यानंतर कारागृह प्रशासनाने उघडलेल्या तात्पुरत्या कारागृहातून पाच कैदी पसार झाल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली होती. त्यातील पसार झालेल्या सनी टायरल पिंटो (वय २५, रा. पानसरे कॉलनी, पडवळनगर, थेरगांव) यास वाकड पोलिसांनी आज शनिवारी गजाआड केले आहे.
पिंटो याला अद्याप शिक्षा झालेली नाही. त्यामुळे न्यायाधीन बंदी म्हणून त्याला तात्पुरत्या कारागृहात हलविण्यात आले होते. गुरुवारी पहाटे त्याच्यासह इतर आरोपींनी तात्पुरत्या कारागृहातील पहिल्या मजल्यावर असलेल्या खोलीतील खिडकीचे गज वाकवले. खिडकीतून उडी मारून जण पसार झाले होते. त्याला पुढील कारवाईसाठी येरवडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.















