न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. जुलै. २०२०) :- करोनाच्या पार्श्वभूमीवर अप्पर तहसिलदार पिंपरी चिंचवड कार्यालयाने दाखले घरबसल्या ऑनलाईन मिळण्याची व्यवस्था केली आहे. नागरिकांनी ‘आपले सरकार’ (https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en) या वेबसाईटवर माहिती आणि कागदपत्रे सादर केल्यानंतर त्यांच्या ई-मेल आयडीवर डिजिटल स्वक्षरीयुक्त दाखले मिळणार आहेत.
पुणे जिल्ह्यात प्रथमच अप्पर तहसिलदार पिंपरी चिंचवड कार्यालयामार्फत (https://apparpcmc2020.blogspot.com/2020/07/blog-post.html?m=1) ही वेबसाईट तयार करण्यात आलेली आहे. या वेबसाईटवर कशाप्रकारे अर्ज दाखल करावा यासाठी व्हिडीओ लिंक देण्यात आलेली आहे. नागरिकांना प्रमाणपत्रासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी तसेच ३९ महा ई सेवा केंद्र आणि नागरिक सुविधा केंद्र आकुर्डी यांचे मोबाईल क्रमांकही देण्यात आले आहेत.
नागरिकांना आपले सरकार या पोर्टलवर अर्ज भरण्यास अडचण येत असेल तर त्यांनी पिंपरी चिंचवड हद्दीतील ३९ महा ई सेवा केंद्र आणि नागरिक सुविधा केंद्र आकुर्डी यांच्याशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे जमा करावीत, असे आवाहन तसीलदार गीता गायकवाड यांनी केले आहे.















