- कोरोनाची भीती झुगारून चिकन-मटणाच्या दुकानावर नागरिकांचा उसळला महापूर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९. जुलै. २०२०) :- श्रावण महिना सुरू होण्याच्या अगोदरच ‘गटारी’ साजरी करण्यासाठी पिंपरी-चिंचवडकरांनी आज रविवारी सकाळपासूनच चिकन आणि मटणाच्या दुकानांसमोर रांगा लावल्याचे दिसून आले. दोन ते तीन तास नागरिक रांगेत उभे आहेत.
उद्या पहिला श्रावण सोमवार असल्याने आज ‘गटारी’ साजरी करण्यासाठी चिकन, मटणाच्या प्रत्येक दुकानावर नागरिकांची अक्षरशा झुंबड उडाली. यावेळी सोशल डिस्टंसिंगचा पूर्ण फज्जा उडाल्याचे दिसून आले. अक्षरशा दीड ते दोन तास रांगेमध्ये थांबून अनेकजण चिकन-मटण खरेदी करताना दिसून आले. सकाळपासून साडे चारशे किलो मटण विक्री झाल्याचे एका मटण विक्रेत्याने सांगितले.
महापालिका आयुक्तांनी शहरात दहा दिवस कडक लॉकडाऊन लागू करून काहीही फायदा झालेला दिसत नाही. उलट सोमवारपासून लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे शहरात दिवसेंदिवस उच्चअंकी रुग्णसंख्या वाढत असल्याचे पहावयास मिळत आहे. आयुक्तांचा लॉकडाऊनचा आदेश म्हणजे पुढचे पाठ आणि मागचे सपाट अशीच स्थिती आहे, अशी चर्चा जाणकार पिंपरी चिंचवडकर व्यक्त करताना दिसून येत आहे.