न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१. जुलै. २०२०) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपलेखापाल सिध्दार्थ जगताप (वय ५१) यांचे आज मंगळवारी पहाटे कोरोनामुळे निधन झाले. ११ जुलैला ताप आल्यानंतर केलेल्या तपासणीमध्ये ते पॉझिटिव्ह आल्याचा अहवाल मिळाला होता. त्यानंतर त्यांना महापालिकेच्या भोसरी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दि. १४ जुलै रोजी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने वायसीएममध्ये दाखल करण्यात आले होते. आज पहाटे त्यांचे निधन झाल्याचे रूग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. ते वायसीएममध्ये उपलेखापालपदाची जबाबदारी सांभाळत होते.















