न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१. जुलै. २०२०) :- आईवडील कामानिमित्त बाहेर गेले असता चौथीत शिकणाऱ्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. बाथरूमच्या भिंतीवर चढून ओढणीच्या साहाय्याने त्याने गळफास घेतला. दुपारी अडीचच्या सुमारास त्याचे वडील लक्ष्मण हे घरी आल्यावर आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. ही घटना आज मंगळवारी (दि. २१) रोजी घडली.
व्यंकटेश लक्ष्मणपुरी (वय १०, रा. श्रीकुंज हौसिंग सोसायटी, मोरेवस्ती, चिखली) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. मटणाची भाजी सांडल्याने वडील रागावले. या कारणावरून त्याने आत्महत्या केली. व्यंकटेश आकुर्डीतील महात्मा फुले इंग्लिश स्कूलमध्ये चौथी इयत्तेत शिकत होता.