- “स्वस्थ पिं. चिं. शहर; मी एक जबाबदार नागरिक”
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३. जुलै. २०२०) :- आज राज्यभरात पाचव्या टप्प्यातील लॉकडाऊनचा शेवटचा दिवस, कोरोना विरुद्ध लढाईस आता चार महिन्याचा कालावधी उलटून गेलेला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चाललेली आहे. मागील १० दिवसांमध्ये लॉकडाऊन असूनसुद्धा कोविड १९ चा आलेख मात्र वाढलेलाच दिसून आला. २२ जुलै २०२० रोजी तर बधितांनी ९०० च्या वरती आकडेवारी गाठली. ही आकडेवारी शहराकरिता धोक्याची घंटा आहे. यापुढे आता शहरातील प्रत्येक नागरिकाने कोरोनाविरूद्ध च्या लढ्यामध्ये जबाबदारीने सामील होणे आवश्यक असणार आहे.
आपल्या वागणुकीमध्ये बदल केला नाही तर शहरात कोरोना आटोक्यात येऊ शकणार नाही. त्यामुळे जनजागृती हेतू प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीने आजपासून “स्वस्थ पिंपरी चिंचवड शहर ……मी एक जबाबदार नागरिक” ही कोरोनाविरुद्ध जनजागृती मोहीमेची सुरुवात करण्यात आली.
यामध्ये कोरोना साखळी तोडण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारीपूर्वक प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची हमी स्वतःच्याच कुटुंबियांना द्यायची आहे. घरातून बाहेर पडताना तोंडावर मास्क लावणे, सामाजिक दुरीचे पालन करणे, हाताची स्वच्छता राखणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, एकाच ठिकाणी जास्त वेळ न थांबने, आरोग्य सेतू अँप डाऊनलोड करणे, कोरोना योद्धे म्हणजेच स्वच्छता कर्मचारी, पोलीस, डॉक्टर यांचा आदर करणे व त्यांच्या सूचनांचे पालन करणे, कोठेही थुंकणार नाही हे महत्वाचे ब्रीदवाक्य तंतोतंत पाळणे, कोरोना संक्रमित बांधवांसाठी भेदभाव न करणे, सामाजिक भान राखणे, सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायझर चा वापर करणे इत्यादी महत्वपूर्ण बाबीं अंगीकारायच्या आहेत.
या मोहिमेकरिता विभागप्रमुख म्हणून नाना कुंबरे,प्रदीप पिलाणे, उमेश कांगुडे, अर्चना घाळी,अँड. विद्या शिंदे, विभावरी इंगळे, गौरी सरोदे,देवयानी पाटील, सीमा निकम,विजय मुनोत,बाबासाहेब घाळी, सतीश देशमुख, गोपाळ बिरारी,विजय जगताप,संतोष चव्हाण,जयप्रकाश शिंदे,अंकुश घारे, जयेंद्र मकवाना, मुजफ्फर इनामदार,लक्ष्मण इंगवले,विशाल शेवाळे, नितीन मांडवे, सुकेश येरूनकर, राजेश बाबर, अजय घाडी, तेजस सापरिया, सतिश मांडवे,मंगेश घाग,राम सुर्वे,संदीप सकपाळ, महेश काकडे,प्रवीण इथापे, प्रशांत शिंपी,धीरज बोरा,सुनिल पाटील,मनोज ढाके,सुरेश गावडे,तुषार मकवाना,अमित चौहान, शशिकांत इंगळे,राजेंद्र येळवंडे, अमित डांगे,अमोल कानु,विशाल माने,गौतम चोबे, शशिकांत पिल्ले,सुनिल चौगुले, हे काम पाहणार आहेत.
शहराच्या प्रत्येक नागरिकाने ह्या मोहिमेत सामील होऊन प्रशासनाला सहकार्य करायचे आहे. आपले शहर लवकरच कोरोनामुक्त होण्यासाठी प्रयत्न करायचा आहे.















