न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३. जुलै. २०२०) :- महानायक अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ११ जुलैपासून करोनाशी लढा देत असलेल्या आली आहे. ११ जुलै रोजी बच्चन यांना करोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं होतं.
त्यानंतर त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. बिग बीं बरोबरच बच्चन कुटुंबातील अभिषेक बच्चन, ऐश्वर्या आणि आराध्या यांनाही करोनाचा संसर्ग झाला होता. हे कुटुंब सध्या उपचार घेत असून, अमिताभ बच्चन यांची करोना चाचणी निगेटिव्ह आल्यानं बच्चन कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.















