- आज एकाच दिवसात १०४२ जणांना कोरोनाची बाधा; तर १६ जणांचा मृत्यू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५. जुलै. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज शनिवारी (दि. २५ जुलै) रोजी १०४२ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. आज पिंपरी चिंचवड हद्दीतील ११ आणि हद्दीबाहेरील ५ अशा १६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
यात पिंपळे गुरव ( पुरुष ७० वर्षे ), संत तुकाराम नगर पिंपरी (पुरुष ५६ वर्षे), पिंपरी ( स्त्री ६४ वर्षे, पुरुष ८० वर्षे), चिंचवड (पुरुष ३८ वर्षे, पुरुष ७४ वर्षे, पुरुष ९५ वर्षे), दापोडी (पुरुष ४५ वर्षे), नेहरुनगर (पुरुष ७५ वर्षे), च-होली (पुरुष ६७ वर्षे), मोहनगर (पुरुष ६७ वर्षे), म्हाळुगे (पुरुष ३८ वर्षे), विश्रांतवाडी (स्त्री ७२ वर्षे), बालेवाडी (पुरुष ८५ वर्षे), मुळशी (पुरुष ६८ वर्षे), हिंजवडी ( स्त्री ८४ वर्षे) यांचा समावेश आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १५६३२ वर पोहोचली आहे. महापालिका रुग्णालयात ३५६३ रुग्ण उपचार घेत आहे. तर, आजपर्यंत शहरातील एकूण २७६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १०१५८ वर पोहोचली आहे. आज पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा सुरु झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.