न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७. जुलै. २०२०) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कोविड समर्पित वायसीएम रुग्णालयातील डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरु केले आहे.
सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकाने रविवारी रात्री दादागिरीची भाषा वापरत डॉक्टरांना मारहाण केली. त्यामुळे वायसीएममधील डॉक्टरांनी आज सोमवारी सकाळी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
जोपर्यंत संबंधित भाजपच्या नगरसेवकावर फौजदारी गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही काम बंद ठेवणार असल्याचा पवित्रा डॉक्टरांनी घेतला आहे. त्यामुळे कोरोनाच्या अशा गंभीर अवस्थेत डॉक्टरांवर सत्ताधारी पक्षाचे नगरसेवकच अन्याय करणार असतील तर, डॉक्टरांनी रुग्णांवर उपचार कसे करायचे. अशा नगरसेवकावर तात्काळ आयुक्तांनी कारवाई करून चौकशी लावावी, अशी मागणी डॉक्टर रुग्णालयाबाहेर येऊन आंदोलनाद्वारे करू लागले आहेत.


















