- तर, निगडीतील रेशनिंग कार्यालयातील आणखी दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७. जुलै. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात रविवारी (दि. २५ जुलै) रोजी ६५१ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील ८ आणि हद्दीबाहेरील १ अशा ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
यात वाकड (स्त्री ६५ वर्षे), वाल्हेकरवाडी (पुरुष ५५ वर्षे), निगडी (पुरुष ५२ वर्षे), चिंचवड (स्त्री ६५ वर्षे, पुरुष ५४ वर्षे, पुरुष ६४ वर्षे), चिखली (पुरुष ८६ वर्षे), मोरवाडी (स्त्री ७१ वर्षे), पाषाण (पुरुष ३० वर्षे) यांचा समावेश आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १६२८३ वर पोहोचली आहे. महापालिका रुग्णालयात ३४२७ रुग्ण उपचार घेत आहे. तर, आजपर्यंत शहरातील एकूण २८४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १०९११ वर पोहोचली आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा सुरु झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.
निगडी येथील संत तुकाराम व्यापारी संकुल इमारतीमध्ये असलेल्या ‘अ’ परिमंडळ रेशनिंग कार्यालयातील आणखी दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी एक पुरुष पुरवठा निरीक्षक आहे तर दुसऱ्या महिला लिपिक आहेत. कार्यालयातील आणखी दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे कार्यालय पुन्हा काही दिवस बंद ठेवण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परिमंडळ कार्यालयातील लिपिक १६ जुलै रोजी पॉझिटिव्ह आल्यानंतर कार्यालय पुढील आठ दिवसांसाठी बंद करण्यात आले होते. मात्र, कार्यालयातील आणखी दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे कार्यालय आणखी काही दिवस बंद ठेवण्याची शक्यता वर्तविली जात आहे.


















