न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७. जुलै. २०२०) :- भोसरी येथील मुलाणी पेट्रोल पंपाच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी कपाटातील साडेसात लाख रुपयांची रोकड चोरून नेली. सीसीटिव्ही फुटेज कॅमेऱ्यावर चादर टाकून चोरटयांनी ही चोरी केल्याचे स्पष्ट झाले. भोसरी पोलिसांनी दोन तासात गुन्हा उघडकीस आणून साडेसात लाख रुपयांची रोकड चोरट्यांकडून हस्तगत केली आहे.
नारायण अप्पा पवार (वय २६ वर्षे), रमेश प्रभू पवार ( वय २२ वर्षे) दोघेही रा. भारतमाता नगर, दिघी. मूळगाव पाटोदा, बीड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. भोसरी पोलिस पुढील तपास करीत आहेत.


















