- नगरसेवकाविरोधात एफआयआर दाखल करण्याचे दिले निर्देश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७. जुलै. २०२०) :- सत्ताधारी भाजप नगरसेवकाने रविवारी रात्री दादागिरीची भाषा वापरत डॉक्टरांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ वायसीएममधील डॉक्टरांनी आज सोमवारी सकाळी काम बंद आंदोलन केले होते.
जोपर्यंत संबंधित भाजपच्या नगरसेवकावर फौजदारी गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही काम बंद ठेवणार असल्याचा पवित्रा डॉक्टरांनी घेतला होता. डॉक्टरांनी रुग्णालयाबाहेर येऊन आंदोलन पुकारले होते. अखेर या आंदोलनकर्त्या डॉक्टरांसमोर महापालिका आयुक्त झुकले असून संबंधित नगरसेवकाविरोधात एफआर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच वायसीएमसाठी पोलिसांकडून अतिरिक्त सुरक्षा घेण्यात येणार आहे.
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करत भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी डॉक्टरांशी हुज्जत घातली होती. तसेच त्यांच्यात वादावादी झाली होती. तर, वाघेरे यांनी आपण शिविगाळ केली नाही. केवळ जाब विचारल्याचे सांगत आरोप फेटाळले होते.


















