न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९. जुलै. २०२०) :- पिंपळे गुरवमधील काटेपुरम चौकातले वडाचे जुने झाड पावसामुळे कोसळले. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी रस्त्याच्या मधोमध पडल्याने वाहतूक कोंडी झाली होती. बराचकाळ रस्त्यात झाड पडल्याने नागरिकांना ये-जा करणे मुश्किल झाले होते.
याची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जावून संबंधीत अधिकाऱ्यांना फोन करून, झाड रत्यातून बाजूला केले व रस्ता वाहतुकीस मोकळा करून दिला. वृक्ष उन्मळलेल्या जागेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दुसऱ्या झाडाचे रोपण करण्यात आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी मनसेच्या कामाचे कौतुक केले.
यावेळी मनसेचे उपविभाग अध्यक्ष अनिल भुजबळ, प्रभाग अध्यक्ष प्रदिप गायकवाड, राजू जैन, सोहनलाल चौधरी, गौतम जैन, तात्या जगताप, अशोक गंगणे, लक्ष्मीकांत सकट आदी उपस्थित होते.


















