न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१. जुलै. २०२०) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शिवसेना गटनेते तथा नगरसेवक राहुल कलाटे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीस ५ लाख १५ हजार १०० रुपयांची आर्थिक मदत केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यावेळी त्यांनी मदतीचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला.
नगरसेवक झाल्यापासुन आजपर्यंत मिळणारे पालिकेचे मानधन त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीस दिले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या मदतीबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले.