अहमदाबाद येथे महाराष्ट्र संघाकडून खेळणाऱ्या पिंपरी-चिंचवड भागातील खेळाडूंनी एकतर्फी लढत देऊन महाराष्ट्राला प्रथम स्थानावर पोहचवण्यात महत्त्वाची कामगीर केली आहे. महाराष्ट्र संघाचे पदाधिकारी डॉ. गौतम चाबुकस्वार, हाजी दस्तगीर, एस.डी. गायकवाड, पाशा अत्तार यांनी स्पर्धेत विजयी झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन केले. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ व्यवस्थापक व प्रशिक्षक नरेश म्हेत्रे, नजीम शेख, पिंपरी-चिंचवड थायबॉक्सिंग असोसिएशनचे कार्याध्यक्ष जमीर शिकलगार यांचे खेळाडूंना मार्गदर्शन मिळाले. पंच समितीमध्ये सुरेश कोळी, ऋषिकेश सोनावणे, जैद शेख, मोईन अत्तार यांचा समावेश होता.
या स्पर्धेत साक्षी देशपांडे, हेतल शहा, शिवराज गावडे, कृष्णा गावडे, विश्वा तेवर, सुरज मुंडे, अजीत जैस्वार, प्राजल बाबानगर, चैतन्य चौधरी, सोहम कुलकर्णी आदींनी सुवर्ण पदक, नीरज गुरव, सुचिता नितनवरे, पार्थ पंजाबी, कृष्णा मोरे, राजेंद्र पटीर, रोहिनी तळेकर, दमयंती महाजन, अक्षीत शेट्टी, सौरभ किन्होळकर यांनी रजत पदक तर दर्शन गावडे, कबीर मुल्ला, स्वराज बर्वे, दैवीक लक्ष्मीपती, ज्ञानदा तौर, प्रेम चिंचवडे, ओमकार शिंदे, नीरव चव्हाण, विराज पवार, दीपक राम, प्रेम कांबळे यांनी कास्य पदक पटकावले.
पिंपरी – राष्ट्रीय थायबॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राचे वर्चस्व, पुन्हा एकदा चॅम्पीअनशिप पटकावली.












