- ‘बोले तसा चाले’ असे व्यक्तिमत्व असलेला नेता…
- आ. अमित गोरखे यांनी अजित पवारांना वाहिली भावनिक श्रद्धांजली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २८ जानेवारी २०२६) :- राजकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्त्व आमदार अमित गोरखे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावनिक श्रद्धांजली अर्पण करणारा संदेश सोशल मीडियावर शेअर केला आहे. या संदेशामध्ये त्यांनी अजित पवार यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदान, लोकाभिमुख नेतृत्व आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी केलेल्या कार्याचा उल्लेख केला आहे.
अमित गोरखे यांनी आपल्या श्रद्धांजली संदेशात म्हटले आहे की, स्पष्टवक्तेपणा, ठाम निर्णयक्षमता आणि जनतेशी असलेले नाते यामुळे अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळे स्थान निर्माण केले. अर्थमंत्रीपदाच्या काळात राज्याच्या विकासासाठी, महिला सक्षमीकरण, शेतकरी कल्याण आणि युवकांसाठी राबवलेल्या योजनांचे योगदान अतुलनीय असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
‘ते खऱ्या अर्थाने विकासाचे दादा होते’, या भावनिक संदेशात त्यांनी पवार कुटुंबीयांप्रती तसेच कार्यकर्त्यांप्रती संवेदना व्यक्त करत, “ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो,” अशी प्रार्थनाही व्यक्त केली आहे.

















