- पिंपरी चिंचवड महापालिकेची अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली…!
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २८ जानेवारी २०२६) :- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी विमान दुर्घटनेत अपघाती निधन झाले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामधील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, शहर अभियंता मकरंद निकम,नगररचना उपसंचालक किशोर गोखले,मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रविण जैन, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, सह आयुक्त मनोज लोणकर, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, आयुक्त अण्णा बोदडे, संदीप खोत, राजेश आगळे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महापालिका कर्मचारी उपस्थित होते. यावेळी अधिकारी,कर्मचाऱ्यांनी मौन पाळून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरांजली वाहिली.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवस दुखवटा जाहीर करण्यात आला असून आज प्रशासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

















