- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू…
अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
बारामती (दि. 28 जानेवारी 2026) :- राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) सर्वेसर्वा अजितदादा पवार यांचा आज बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
आज सकाळी जवळपास 8:45 वाजता त्यांचे विमान बारामती विमानतळावर लँडिंग करत असताना अपघातग्रस्त झाले. प्राथमिक माहिती नुसार अपघात इतका गंभीर होता की विमान जळून खाक झाले सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे असे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
अजित पवार आज बारामतीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी येत होते. अपघातानंतर आपत्कालीन सेवा, अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अपघातग्रस्तांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे.
घटनेची कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत, परंतु अपघात लँडिंग दरम्यान तांत्रिक अडचणींमुळे किंवा अन्य कारणास्तव घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तपासासाठी नागरी विमानपर्यटन विभाग (DGCA) आणि संबंधित अधिकाऱ्यांना तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या भीषण अपघाताने केवळ सरकारला नाही तर संपूर्ण राज्यासह पिंपरी-चिंचवड शहराला मोठा धक्का बसला आहे. शोक संतप्त कुटुंबिय आणि समर्थकांसोबत राज्यभर शोककळा पसरली आहे. राजकीय नेते आणि नागरिकांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त करत आहेत.
















