न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार नवनियुक्त पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे आला आहे. शासनाने विभागीय आयुक्त पदनामाने प्राधिकरणाच्या अध्यक्ष पदावर नेमणूक केली असल्याने राव यांच्याकडे ही जबाबदारी आली आहे.
डॉ . दीपक म्हैसेकर हे शुक्रवारी (दि. ३१) सेवानिवृत्त झाले. त्यामुळे त्यांच्या जागी सौरभ राव यांची विभागीय आयुक्त पदावर नेमणूक या करण्यात आली आहे. त्यामुळे आपोआपच प्राधिकरणाचा कार्यभार देखील राव यांच्याकडे आला आहे.