न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२. ऑगस्ट. २०२०) :- रक्षाबंधनावर यंदा ‘ करोना’चे सावट आहे. बहिणीचे करोनारुपी संकटातून रक्षण व्हावे, यासाठी परंपरागत गिफ्टच्या ऐवजी ‘करोना संरक्षक किट’ ला मागणी वाढली आहे. आकर्षक गिफ्ट पॅकमध्ये या किट्स बाजारात उपलब्ध आहेत.
परंपरागत गिफ्टबरोबरच बहिणींना करोनापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त ठरु शकणारे सर्वसमावेशक करोना संरक्षक गिफ्ट व्हाऊचर बाजारात उपलब्ध झाले असून, त्याला भावांकडून चांगली मागणी असल्याचे चित्र आहे. सोमवारी (दि. ३) रोजी साजऱ्या केल्या जाणाऱ्या रक्षाबंधनाच्या सणवारदेखील करोनाचा मोठा प्रभाव पडला आहे. त्यामुळे बहिणीने ओवाळल्यानंतर तिला गिफ्ट म्हणून एखादी परंपरागत भेटवस्तू देण्याऐवजी विविध वस्तुंचा एकत्रित संच असलेले ‘करोना संरक्षक किट’ द्यावे. जेणेकरून तिचे कोरोनापासून संरक्षण होईल.
या किटमध्ये शंभर मिली सनिटायझर, हँड वॉशच्या बाटल्या, कापडी हँड ग्लोव्हज, फेस मास्क, शुभेच्छा संदेश असणारे स्टीकर असतात. हे किट दोनशे ते तीनशे रुपयांमध्ये उपलब्ध आहेत.