न्यूज पीसीएमसी नेटवर्क ले
पिंपरी (दि. ०२. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माजी महापौर दिवंगत मधुकरराव पवळे यांचे जयंती निमित्त महानगर पालिका मुख्य प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस आणि निगडी येथील त्यांच्या पुतळ्यास महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसदस्य सुमन पवळे, सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर, मनोज लोणकर, माहिती जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.


















