- सामाजिक कार्यकर्ते नितीन कोकणे ठरतायेत अपघातग्रस्तांना आधार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरातील जगताप डेअरी चौकात मोठ्या प्रमाणात हिंजवडी आयटी पार्ककडे जाणारा कर्मचारी वर्ग असल्याने या चौकात वाहतूक कोंडी होत होती. या उद्देशातून या चौकात पुलाची उभारणी करण्यात आली. मात्र, हा पुल मृत्यूचे सापळे ठरू पाहत आहेत. वाहतुकीसाठी बनवण्यात आलेल्या या पुलावर अपघातांची मालिका सुरू आहे. मध्यरात्रीच्या सुमास मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत.
याबाबत माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते नितीन कोकणे म्हणाले की, या पुलावर वाहनांचा अपघात होणे ही रोजचीच बाब झाली आहे. मला रोज तेथून अपघाताचे फोन येत आहे. रोज रात्री-अपरात्री तिथे जाऊन अपघातग्रस्तांना हॉस्पिटलमध्ये न्यावे लागत आहे. मी व माझे मित्र आम्ही अँबुलेन्स तसेच पोलिसांना संपर्क करून घटनेची माहिती देतो. अनेक वेळा अँबुलन्स देखील मिळत नाही. आमच्याच पैकी कोणी स्वतःच्या गाडीत अपघातग्रस्तांना हॉस्पिटलमध्ये नेतो. परंतु हे कुठे तरी थांबण्याची गरज आहे. पुलावरील रस्ता हा निसरडा झालेला आहे तो जर व्यवस्थित केला तर अपघातांना आळा बसू शकतो. त्यामुळे याकडे प्रशासनाने त्वरित लक्ष घालून रस्त्याची डागडुजी करावी.