न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात रविवारी (दि. ०२ ऑगस्ट) रोजी ८७१ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील ०६ आणि हद्दीबाहेरील ०२ अशा ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
यात पिंपळे गुरव (पुरूष वय ५६), काळेवाडी (पुरूष वय ७२), चिखली (पुरूष वय ५७), पिंपरी (पुरूष वय ५६), चिंचवड (पुरूष वय ५८), आळंदी (पुरूष वय ७२), पुणे (पुरूष वय ६०), (स्त्री वय ४७) भोसरी यांचा समावेश आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या २२९३४ वर पोहोचली आहे. महापालिका रुग्णालयात ३७०४ रुग्ण उपचार घेत आहे. तर, आजपर्यंत शहरातील एकूण ३७७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १५४७९ वर पोहोचली आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा सुरु झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.