न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती – शक्ती समूह शिल्प चौकातील उड्डाणपुलाचे काम ९० टक्के पूर्ण झाले असून, पुणे – मुंबई जुन्या महामार्गावरील निगडी – देहूरोड हा रस्ता वाहतुकीस येत्या १५ दिवसांत खुला करण्यात येणार आहे.
हा चौक सिग्नल फ्री करून वाहतूक रहदारी अधिक सुरक्षित करण्यासाठी या चौकात उड्डाणपूल, ग्रेडसेरपेरेटर व वर्तुळाकार मार्ग तयार केला जात आहे. या परिसरातील अतिउच्च विद्युतवाहक तारा व टॉवर हटविण्यास विलंब झाल्याने आणि महामार्ग प्राधिकरणाची व देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून परवानगी मिळण्यास विलंब झाल्याने या कामास ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत ६ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे सुमारे ३ महिने काम बंद होते. उपलब्ध कामगारांकडून सध्या काम सुरु आहे.













