न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. ऑगस्ट. २०२०) :- एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये कामाला असणारी २६ वर्षीय महिला आपलं काम आटोपून ती दुपारच्या सुमारास आपल्या घरी जाण्यास निघाली होती. तेव्हा, अचानक एका ४० वर्षीय अज्ञात व्यक्तीने या महिलेला कोयत्याचा धाक दाखवून जबरदस्तीने द्रुतगतीमार्गालगत असलेल्या झाडीत नेले आणि तिथं तिच्यावर बलात्कार केला.
आरोपीने महिलेच्या अंगावरील कपडे कोयत्याने फाडत तिला बेदम मारहाण आणि शिवीगाळ केल्यांचंही फिर्यादीत म्हटलं आहे. पीडित महिलेने स्वतःचं पोलीस नियंत्रण कशाला फोन करून संबंधित घटनेविषयी माहिती दिली. त्यानंतर तात्काळ महिला पोलिसांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन अधिक चौकशी केली. त्यानंतर पीडित महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गालगत मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.