न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८. ऑगस्ट. २०२०) :- राज्यातील करोनाबाधितांची संख्या आता ५ लाखांपेक्षा जास्त झाली आहे. आज दिवसभरात राज्यात तब्बल १२ हजार ८२२ नवे करोनाबाधित आढळले तर २७५ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
यामुळे राज्यातील करोनाबाधितांची संख्या ५ लाख ३ हजार ८४ वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार घेत असलेले १ लाख ४७ हजार ४८ रुग्ण तर आतापर्यंत मृत्यू झालेल्या १७ हजार ३६७ जणांचा समावेश आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयच्या हवाल्याने एनएनआयने हे वृत्त दिले आहे.
राज्यात आज ११ हजार ८१ रुग्णांनी करोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तर, आजपर्यंत राज्यात तब्बल ३ लाख ३८ हजार २६२ जण करोनामुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट ६७.२६ टक्क्यांवर पोहचला आहे. तर मृत्यू दर ३.४५ टक्के इतका आहे.