न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज शनिवारी (दि. ०८ ऑगस्ट) रोजी ९८७ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील १४ आणि हद्दीबाहेरील ०४ अशा १८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
यात आकुर्डी (पुरूष वय ५५), भोसरी (पुरूष वय ७२), भोसरी (पुरूष वय ६२), वाल्हेकरवाडी (पुरूष वय ६७), काळेवाडी (पुरूष वय ५५), चिखली (पुरूष वय ८१), चिंचवड (पुरूष वय ५६), चिंचवड (पुरूष वय ६२), चिंचवड (पुरूष वय ३५), पिंपरी (पुरूष वय ५०), पिंपरी (पुरूष वय ६३), स्पाईनरोड, भोसरी (पुरूष वय ३५), (स्त्री वय ६३) डांगेचौक, (स्त्री वय ६३) थेरगाव, चाकण (पुरूष वय ५०), चाकण (पुरूष वय ६०), सहयोगनगर (पुरूष वय ५५), (स्त्री वय ४७) देहूरोड) यांचा समावेश आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या २८०६५ वर पोहोचली आहे. महापालिका रुग्णालयात ४८५१ रुग्ण उपचार घेत आहे. तर, आजपर्यंत शहरातील एकूण ४७५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १९३१२ वर पोहोचली आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा सुरु झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.