न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑगस्ट २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे प्रथम दिवंगत अध्यक्ष स्व. शंकर (आण्णा) गावडे यांचा १७ वा स्मृतिदिनी त्यांच्या निवासस्थानी अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषा ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, कर्मचारी महासंघाचे मा. अध्यक्ष शशिकांत उर्फ बबनराव झिंजुर्डे, यामिनी शंकर (आण्णा) गावडे, शेखर शंकर (आण्णा) गावडे, अपर्णा शेखर गावडे व जुन्या कर्मचारी महासंघाचे सर्वच पदाधिकारी उपस्थित होते.