न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समितीचा कार्यकाळ ८ ऑगस्ट रोजी संपला आहे. त्यामुळे शिक्षण समिती सभापतीचे कार्यालय बंद करण्यात आले आहे. करोना विषाणूचे संक्रमण असल्यामुळे शिक्षण समितीची निवडणूक होणार नाही. जोपर्यंत शासनाचा आदेश येत नाही तोपर्यंत शिक्षण समितीचा कारभार महापालिकेच्या महासभेतून चालणार आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका शिक्षण समितीची समितीची गतवर्षीची निवडणूक ९ ऑगस्ट २०१९ रोजी पार पडली होती. निवडणूकीतून नगरसेविका मनिषा पवार या शिक्षण समितीच्या सभापती झाल्या. त्यांचा कार्यकाळ शनिवारी (दि. ८) संपला.
यापूर्वी २०१८ साली शिक्षण समिती सुरू करण्यात आली. पहिल्या सभापती होण्याचा मान भोसरीतील नगरसेवविका सोनाली गव्हाणे यांना मिळाला होता. पवार यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांचे कार्यालय प्रशासनाकडून बंद करण्यात आले आहे. यापुढे शिक्षण समितीचा कारभार महापालिकेच्या महासभेतून चालणार आहे.