- आज शहरातील ७८३ बाधित तर १४ जणांचा मृत्यू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज सोमवारी (दि. ११ ऑगस्ट) रोजी ७८३ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा १४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
यात निगडी (पुरुष ७३ वर्षे), भोसरी (स्त्री ८० वर्षे), दिघी (पुरुष २४ वर्षे, पुरुष ५२ वर्षे), पिंपरी (पुरुष ६३ वर्षे), दापोडी (पुरुष ८० वर्षे), मोरवाडी ( पुरुष ७० वर्षे), वाकड (पुरुष ६० वर्षे), चिंचवड (पुरुष ४७ वर्षे), पिंपळे निलख (स्त्री ८० वर्षे), पुनावळे (पुरुष ३४ वर्षे) तसेच पुणे मनपा हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण निगडी (स्त्री ५५ वर्षे), भोसरी (स्त्री ४० वर्षे, स्त्री ५४ वर्षे) सांगवी यांचा समावेश आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ३०६१९ वर पोहोचली आहे. महापालिका रुग्णालयात ५३१३ रुग्ण उपचार घेत आहे. तर, आजपर्यंत शहरातील एकूण ५१० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २१७९८ वर पोहोचली आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा सुरु झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.