न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३. ऑगस्ट. २०२०) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या गुणपत्रिका १७ ऑगस्टपासून देण्यात येणार आहेत. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ठरावीक दिवशीच गुणपत्रिका नेण्याची सक्ती विद्यार्थ्यांवर करू नये, अशी सूचना राज्य मंडळाने शाळांना दिली आहे.
विद्यार्थ्यांनी ठरावीक दिवशीच शाळेत येऊन गुणपत्रिका घेण्याची सक्ती करण्यात येऊ नये, शाळांमध्ये पालक-विद्यार्थ्यांची एकाच वेळी गर्दी न होण्याबाबत नियोजन करावे, असे आदेश राज्य मंडळाचे सचिव डॉ. भोसले यांनी विभागीय मंडळाच्या सचिवांना दिले आहेत.














