न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३. ऑगस्ट. २०२०) :- महाराष्ट्रात जिल्हाबंदी लागू आहे. नागरिक ई-पासद्वारे रीतसर परवानगी घेऊन इतर जिल्ह्यात जाऊ शकतात. याच ई-पासचा गांजा विक्री करण्यासाठी वापर झाल्याचं उघड झाले आहे. लातूरहून शहरात गांजा विक्री करण्यासाठी येणाऱ्या आरोपीला चिंचवड येथे गांजासह पोलिसांनी अटक केली आहे.
संबंधित आरोपीकडून १० लाख १५ हजारांचा मुद्देमाल यात २० किलो ५९५ ग्रॅम गांजा आणि एक चारचाकी मोटार अमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केली आहे.
अल्लाबक्ष नजीर शेख वय-२६ रा. महात्मा गांधी रोड, लातूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो लातूर येथून चारचाकी मोटारीने शहरात यायचा. त्याच्याकडे ई-पास मिळाला असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. वाकड, डांगे चौक आणि चिंचवड याठिकाणी पोलिसांनी सापळा रचला होता.














