न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३. ऑगस्ट. २०२०) :- खराळवाडी येथे भगवतगीता मंदिराजवळ मोरेश्वर नागरिक सहकारी पतसंस्था आहे. मंगळवारी (दि. ११) दुपारी पतसंस्था कुलूप लावून बंद केली होती. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी पतसंस्थेचे शटर उचकटून आत प्रवेश केला.
पतसंस्थेच्या कॅशियर काउंटरच्या ड्रॉवरमधून रोख रक्कम आणि सीसीटीव्ही कॅमे-याच्या डीव्हीआर असा एकूण १३ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. बुधवारी सकाळी पतसंस्था उघडण्याच्या वेळी हा प्रकार उघडकीस आला.
ही घटना बुधवारी (दि. १२) सकाळी नऊ वाजता उघडकीस आली.नंदकिशोर शंकर नकाते (वय ४८, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.