न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९. ऑगस्ट २०२०) :- सामाजिक बांधिलकीतून व नैतिक जबाबदारी समजून मी आज आपला प्लाझ्मादान केला आहे, तरी सध्या प्लाझमाची कोरोना रुग्णांना अत्यंत गरज दिसून येत आहे. एका प्लाझ्मा दानाने आपण दोन रूग्णांचे प्राण वाचवू शकता. एकजूटीने कोरोनाला हद्दपार करूया मी प्लाझ्मा दान करून एक छोटासा प्रयत्न जनजागृतीचा केला आहे, असे विचार भाजप नगरसेवक प्रा उत्तम केंदळे यांनी प्लाझ्मादान केल्यानंतर मांडले.
केंदळे म्हणाले की, सध्या कोरोना विरुद्धच्या संघर्षातही डॉक्टर आणि पोलिसांनी सामाजिक भान राखत प्लाझ्मा दान केला आहे कोरोनामुक्त झालेल्या पोलीस, डॉक्टरांकडून प्लाझ्मा दान, कोरोना योद्धांचे सामाजिक भान दिसून आले त्याच प्रमाणे भाजप शहर अध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी सुद्धा प्लाझ्मा दान केला आहे तसेच त्यांनी शहरातील सर्व कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना आवाहन केले आहे की,आपण प्लाजमा दान करावा त्या अनुषंगाने लोकप्रतिनिधी म्हणून मी आज माझा प्लाझ्मा दान केला आहे
समाजात समाज सेवा करताना सामाजिक क्षेत्रात पदावर काम करणाऱ्यानी तसेच प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या आदर्श व्यक्ती,असो किंवा प्रसिद्ध व्यक्ती म्हणून मानले जाते त्यामुळे अशा व्यक्तींनी समाजापुढे आदर्श ठेवला तरच कोरोनामुक्त झालेली प्रत्येक व्यक्ती प्लाझ्मा दान करण्यास पुढे येईल आणि कोरोना रुग्णांना उपचारासाठी मदत होईल व लवकर आपला महाराष्ट्र तसेच देश कोरोनामुक्त होईल असा विश्वास या वेळी केंदळे यांनी व्यक्त केला
श्री गणरायाचे आगमन होत असताना समाजावर असणारे कोरोनाचे संकटसुद्धा गणरायाच्या कृपेने लवकरच दूर होईल, असा विश्वास भाजप नगरसेवक प्रा उत्तम केंदळे यांनी व्यक्त केला.














