न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९. ऑगस्ट २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची आज बुधवारी होणारी स्थायी समितीची सभा उद्या गुरुवार दि. २० ऑगस्ट सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते.
यावेळी दिवंगत माजी महापौर रंगनाथ फुगे, जेष्ठ गायक संगीत मार्तंड पंडित जसराज, क्रिकेटपट्टू चेतन चव्हाण, प्रसिद्ध शायर, गीतकार राहत इंदोरी, कॅप्टन दिपक साठे तसेच दहशवाद्यांशी चकमकीत शहीद झालेल्या आणि कोरोनामुळे मयत झालेल्या शहरातील नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.














